संभूआप्पा- बुवाफन उरुस
श्रेणी अन्य
- दक्षिण महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांची श्रध्दा असणारा संभूआप्पा बुवाफन उरुस इस्लामपूरच्या धार्मिक परंपरेचे संचित.
- लिंगायत समाजातील संभूआप्पा हे मुस्लिम समाजातील संत बुवाफन यांचे शिष्य. गुरुसाठी स्वतःच्या मांडीच्या कातडयाची पादुका तयार करुन दिल्याची कथा सांगितली जाते. गुरु शिष्याच्या नात्यातील भावनिक ओलावा संभू आप्पांनी जपला.
- उरुण परिसरात या गुरुशिष्यांची एकमेकांशेजारी असणारी समाधिस्थळे ही लाखो भाविकांची श्रध्दास्थाने आहेत.
- उरुसाचेवेळी फकीर होणे हा महत्वाचा धार्मिक विधी भक्तीभावाने पार पडतो. फकीर झाल्यानंतर प्रत्येकाने घरात गोड मलिदा, दूध आणि वरण भात देऊन पाच फकीर काढायचे आणि त्यानंतर पाच घरात जाऊन आपणही फकिरी करायची हा त्यामागील हेतू अशी परंपरा आहे .