लक्ष्यवेधी बगाड – भैरवनाथ यात्रा
श्रेणी अन्य
- वाळवा तालुक्यातील कामेरीचे ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रा स्वातंत्र्यपूर्व काळापासून ‘बगाड’ या वैशिष्ठयासाठी प्रसिध्द आहे.
- सोनारी गावाच्या बेलदार समाजातील पवारांना यात्रेचा प्रमुख मान आहे. मंदिराच्या देखभाल व पूजेसाठी गुरव समाजाची विश्वस्त समिती आहे.
- या यात्रेचे वैशिष्ठये म्हणजे बगाड ! बगाड म्हणजे एक प्रकारचा लाकडी गाडा. या बगाडाला पूर्वी दगडी चाके होती. व त्याला भले मोठे 50 फूट उंचीचे शीड होते. बगाड ओढण्यासाठी 5 ते 7 बैलजोडया जुंपल्या जात. कालांतराने बदल होऊन सध्या लाकडी चाकांचा वापर केला जात आहे.
- 50 फूट उंचीचे शीड विजेच्या तारांना घासू लागल्याने त्याची उंची 35 फूट केली आहे. पूर्वी बगाडाला जुंपल्या जाणा-या बैलांना एक महिन्यापेक्षा जास्त काळ विश्रांती दिली जात असे. त्यांना उदीड मका, गाजर व पान मळयातील वैरण खाऊ घातली जात असे. कमीत कमी बैलांनी बगाड ओढल्याचे सांगितले जाते.
- शिडाला नवसाच्या नारळाची तोरणे बांधली जातात. व या गाडयाला 5 ते 8 बैलजोडया जुंपतात.
- गावातील प्रमुख मार्गावरुन भरैवनाथ मंदिर ते हनुमान मंदिर अशा बगाडच्या फे-या काढल्या जातात. हे धावते बगाड पहाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून भाविक उपस्थित रहातात. पूर्वी या बगाडाचा मान भरुगडे, करवडे, शेळके, डंके, पोलीस पाटील, यांच्या भावकीचा होता. परंतु, सध्या सर्वच लोक एकत्रित यात्रा साजरी करतात. यात्रेच्या पहिल्या दिवशी दुपारी 12 पासून सायंकाळी सातपर्यंत बगाडाच्या दहा ते पंधरा फे-या काढल्या जातात. त्यानंतर रात्री पालखी निघते. बिरोबा देवाची पालखी श्रीची बारपटे गल्लीची पालखी व भैरवनाथाच्या पालखीची भेट हनुमान मंदिरासमोर होते. तेव्हा फटाक्याची आतषबाजी केली जाते