बंद

कवठे एकंदची नयनरम्‍य आतषबाजी

श्रेणी अन्य
  • क्रांतिकारी विचारांचा वारसा असणा-या कवठेएंकद गावाचे आराध्‍य दैवत म्‍हणजे श्री सिध्‍दराज. या पांढरीतील भक्‍ती, परंपरा आणि कलेचा अनोखा संगम म्‍हणजेच डोळयाचे पारणे फेडणारी दस-याची आतषबाजी.
  • भारतात कर्नाटकातील म्‍हैसूर संस्‍थान आणि कवठेएंकद या दोन ठिकाणी अशा आतषबाजीचा उत्‍सव साजरा केला जातो.
  • सिध्‍दराजांचा पालखी सोहळा व त्‍या निमित्‍ताने रंगीबेरंगी आतषबाजीचा जल्‍लेोष हे विजादशमीचे वैशिष्‍ठय. उत्‍साह आणि भक्‍तीचा रात्रभर चालणारा हा आनंद सोहळाच !
  • शेकडेा वर्षाची परंपरा असणा-या या आगळया वेगळया कलेची सुरुवात गरजेतून झाली आहे.
  • प्राचिनकाळी दंडाकारण्‍यामध्‍ये हिस्‍त्र श्‍वापदांना भीती दाखविण्‍यासाठी अशा शोभेच्‍या दारुकामाचा प्रारंभ झाला.
  • नवनवीन तंत्राच्‍या साहाय्याने विविध रसायनांचा उपयोग करुन केलेली सप्‍तरंगी आतषबाजी हे येथील वैशिष्‍ठय. गटागटाने लोकवर्गणी जमवून आतषबाजीची साधने घरी तयार केली जात असतं. फटाके निर्मितीत अग्रेसर असणा-या तामिळनाडूतील शिवकाशीच्‍या आतषबाजीशी ती स्‍पर्धा करतात.
  • कवठे एंकद परिसरात शोभेच्‍या दारुकामाचा कच्‍चा माल उपलब्‍ध नसतानाही ही कला जोपासली आहे. काळाबरोबर बदलत जाणारे या आतषबाजीचे स्‍वरुप, तिच्‍यातील वैविध्‍य व कल्‍पकतेमुळे अधिक उठावदार, आकर्षक व नेत्रदीपक बनले आहे. कर्णकर्कश आवाज व धोकादायक प्रकारांवर बंधने घालून सावधानतेने सुखकर दारुकाम करण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. घरोघरी वडिलोपार्जित कला म्‍हणूनच दारुकाम केले जात असे. अशी ही कवठे एकंदची विजादशमीची आतषबाजीची परंपरा.