खरसुंडीची सिध्दनाथ यात्रा
श्रेणी अन्य
- लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खरसुंडीच्या सिध्दनाथची चैत्री यात्रा गुलाल आणि खोब-याची मुक्त उधळण करीत उत्साहात साजरी होते.
- सासनकाठी व पालखी सोहळयावेळी नाथनगरी ‘नाथबाबाच चांगभलं’ या जयघोषात दुमदुमते.
- सिध्दनाथाच्या खरसुंडीतील वास्तव्याने ही नगरी नाथनगरी म्हणून परिचित आहे.
- म्हसवड येथून चिंचाळे येथील भक्त नाथबाबाच्या प्रेमापोटी सिध्दनाथ खरसुंडीत आले अशी आख्यायिका आहे.
- कुंवर गाईच्या खरबसातून दोन स्वयंभू लिंगाच्या रुपाने नाथांचे येथे आगमन झाले. खरवसातून निर्माण झालेली पिंड म्हणून पूर्वी खरवसपिंडी हे नाव खरसुंडीला प्राप्त झाले. कालातरांने तेच नाव खरसुंडी बनले.
- सिध्दनाथांचे मूळ मंदिर हेमाडपंथी असून ते दक्षिणाभिुख आहे. प्रतिदिनी पहाटे नाथांच्या मूर्तीचे होणारे स्नान, पूजा व आकर्षक कपडयांतील पूजा हे येथील वैशिष्य आहे.