श्री गणपती मंदिर, सांगली
दिशाश्रेणी अन्य
१८४४ मध्ये श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधलेले येथील गणेश मंदिर प्रसिद्ध असून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांनी या मंदिरात बैठका घेतल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात.
- थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगलीची स्थापना करुन गणेशदुर्ग भुईकोट किल्ला बांधला आणि श्री गणेश मंदिराची उभारणीही केली. सांगलीचे आराध्य दैवत श्रीगणेश मानले जाते. परंतु फार पूर्वी गणपती पंचायतन संस्थानतर्फे श्री गणेशदुर्गमधील दरबाल हॉलमध्ये वेगवेगळे गणेशोत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. दीडशे वर्षाची ही परंपरा आजही कायम आहे.
- गणेशोत्सवात श्रीगणेशाची दररोजची पूजा-अर्चा आणि सेवा परंपरेप्रमाणे केली जाते आणि उत्सवात निघणारा छबिना, दररोजची गायनसेवा आणि रात्रीची गस्त अशी या उत्सवाची वैशिष्ठयपूर्ण परंपरा आहे.
- गणेश मंदिर व दरबार हॉलमधील गणेशउत्सव वेगवेगळे असतात.
- मंदिरातील गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद शुध्द प्रतिपदेला.होते आणि तो उत्सव भाद्रपद शुध्द पंचमीला लळितांचे कीर्तन होऊन संपतो. शुध्द दशमीला पाकाळणी पूजा होते या उत्सवात हळदी कुंकु आणि शमीचे अनुष्ठान असते. अनुष्ठानात शमीचे एकेक पान वाहण्यात येते.
- दरबार हॉलमध्ये मुख्य गणेशोत्सव.
- गणेश मंदिरातून गणेशमूर्ती वाजतगाजत पालखीतून दरबार हॉलकडे नेली जाते. तेथे चुतुर्थीला गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. पाच दिवस पंचामृत पूजा, अभिषेक, महाआरती, असा कार्यक्रम असतो.
- पूर्वी गणेश विर्सजनाला पालखी वापरली जाई. परंतु पालखीची जागा आता रथाने घेतली. लेझीम, ढोल, ताशे, भजनी मंडळे अशा पारंपारिक पध्दतीही कायम आहेत. पूर्वीच्या उंट व हत्तीची उणीव भासत असून त्यांची जागा आता घोडयांनी घेतली आहे.
- सरकारी घाटावर जाऊन विसर्जन करण्याची परंपरा कायम आहे.
- विसर्जनादिवशी मानक-यांना श्रीफळ देणे, अष्टमीदिवशीच विसर्जन ही प्रथा दोनशे वर्षे काटेकोरपणे सांभाळली आहे.
कसे पोहोचाल? :
विमानाने
पुणे
रेल्वेने
सांगली किंवा मिरज रेल्वे
रस्त्याने
सांगली