बंद

दान्‍नमा देवी यात्रा

श्रेणी अन्य
  • महाराष्‍ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्‍दास्‍थान असलेल्‍या गुड्डापूर (ता.जत) येथील दान्‍नमादेवीची यात्रा कार्तिक अमावास्‍येला भरते.
  • या यात्रेला 40 वर्षाची परंपरा आहे. चालत येणारा भक्‍त, लक्षदीपोत्‍सव, पालखी उत्‍सव, रथ महोत्‍सव महाप्रदास ही या यात्रेची वैशिष्‍ठये. या यात्रेला दरवर्षी 6 ते 7 लाख भाविक येतात.
  • श्रेक्षेत्र गुड्डापूरवासिनी दानम्‍मादेवी ही बसव समकालीन बाराव्‍या शतकात होऊन गेलेली वीरशैव महाशरणी आहे.
  • या यात्रेला पूर्वी गांव स्‍वरुप होते. परंतु गेल्‍या 15 वर्षापासून मोठया प्रमाणात यात्रा भरते. लांबून येणारे भाविक 8, 10 दिवस चालत येतात. यात्रा तीन दिवस भरते.
  • दीपोत्‍सवाला लाखो भाविक या तीर्थक्षेत्री येऊन दीप लावतात.
  • पालखी मिरवणुकीचेवेळी देवीची गावातून मोठी मिरवणूक काढली जाते. 125 किलो वजनाच्‍या पालखीतून मिरवणूक काढली जाते. यामध्‍ये सोन्‍याची मूर्ती असते.
  • रथ महोत्‍सवात देवीच्‍या मूर्तीची रथातून सवाद्य मिरवणूक निघते. या मिरवणुकीत संबळ, कैताळ या वादयांचा सहभाग असतो.
  • पानपूजा या विधीमध्‍ये चांदीच्‍या कमानीवर खाउची पाने खोचून पूजा बांधली जाते
  • गुड्डापूर म्‍ह्रंटल की सहज ओठावर दानम्‍मादेवी यात्रेची आठवण भाविकांना होते.