गगनचुंबी ताबूत
श्रेणी अन्य
- भारतात अनेक ठिकाणी मोहरम सण साजरा केला जातो. हा सण साजरा करण्याच्या प्रथा वेगवेगळया आहेत. इमाम हुसेन यांनी बलिदान देऊन इस्लाम जिवंत ठेवला म्हणून हा सण काही लोक उत्साहाने साजरा करतात.
- कडेगांव शहरात मोहरमची पंरपरा आगळी वेगळी आहे. आकाशाला भिडणारे ताबूत तेथे पाहायला मिळतात. हिंदू मुस्लीम एकत्रित येऊन मोहरम साजरा करतात. गेल्या 200 वर्षापासून ऐक्याची पंरपरा जपत आहेत.
- कडेगांव येथील मोहरम सणाची सुरुवात ब्राम्हणांनी केली. मोहरमला सोन्याचा कळस चढवला. तो थोर संत सय्यदसाहेब हुसेन पिरजादे यांनी !
- मोहरमचे प्रमुख आकर्षण असलेले ताबूत 100 ते 200 फूट उंचीचे असतात. आधी कळस नंतर पाया असे याचे काम करण्यात येते. अष्टकोनी आकाराचे 19 ते 21 मजले बांधले जातात. त्याला कोठेही गाठ दिली जात नाही. चिकणमातीत सूत भिजवून त्याव्दारे मजल्याचे बांधकाम करण्यात येते. हे काम पूर्ण होण्यास एक महिना लागतो.
- मोहरम यात्रेत देशपांडे, पाटील, सातभाई कळवात, बागवान, सुतार, शेटे, शेटे बागवान, माईनकर, शेख आत्तार, तांबोळी, मज्जीद, हकीम मसूद मॉं हे 14 ताबूत व इमाम पंजे सहभागी होतात. मोहरम पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येऊ लागले आहेत. हिंदु मुस्लीम एक्याचे प्रतिक म्हणून कडेगावंच्या मोहरमकडे पाहिले जाते.