नाविन्यपूर्ण उपक्रम > स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन शिबीर > गुरुवार, १८ ऑक्टोंबर, २०१२

18 Oct

स्पर्धा परीक्षांची तयारी करु इच्छिणाऱ्या युवकांसाठी कार्यशाळेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यांमधून जास्तीत जास्त उमेदवारांना प्रशासकीय सेवेमध्ये प्रतिनिधित्व मिळेल असा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे.

शासन सेवेमधील विविध पदांवरील नियुक्तीसाठी विविध स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने यु.पी.एस.सी (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) व एम. पी. एस.सी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) या स्तरांवरील महत्त्वाच्या परीक्षांचा समावेश होतो. जिल्हा प्रशासनाने अशाच परीक्षार्थींसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरविले आहे. या कार्यशाळेमध्ये नामवंत प्रशिक्षकांची तसेच प्रशासकीय सेवेमध्ये निवड झालेल्या व कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.

सध्याचे युग हे स्पर्धा परीक्षांचे युग असल्यामुळे, या परीक्षा देण्याकडे युवा वर्गाचा कल मोठा असल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस या परीक्षांसाठी बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. परंतु सांगलीसारख्या ग्रामीण भागातील सर्वंच विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, दिल्ली यासारख्या ठिकाणच्या कोचिंग क्लासेसचा फायदा घेता येत नाही. अभ्यास कशा प्रकारे करावयाचा, कोणत्या पुस्तकांचे वाचन करावे याची कल्पना त्यांना मिळण्यात अडचणी येतात. यशस्वी उमेदवारांचे अनुभव त्यांना ऐकावयास मिळत नाहीत. त्यामुळे आपल्या भागातील बहुतांश विद्यार्थी या संधीपासून वंचित राहतात.

स्पर्धा परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या सर्व परीक्षार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, यासाठी नावनोंदणी करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. 25 ऑक्टोबर 2012 अखेर श्री. प्रविण माळवे अ.का, (मोबा. 9881076266) व श्री. विनायक यादव अ. का. (मोबा. 9561683014) जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांचे मोबाईलवर आपले पूर्ण नाव व पत्ता एस. एम. एस. (SMS) करावा. या कार्यशाळेची वेळ व ठिकाण आपणास आपल्या मोबाईलवर एस. एम. एस. (SMS) करुन कळविण्यात येईल.

© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.
विकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.
Collector Office Sangli